ताजा खबरे

नगरसेवक घोळवे यांच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे मोफत वाटप ‘जनता कर्फ्यू’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे…..केशव घोळवे


पिंपरी (दि. 21 मार्च 2020) “कोरोना” चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किमान 20 सेकंद साबणाने हात धुवावेत व बाहेरुन आल्यानंतर हाताला सॅनिटायझर लावावे आणि “कोरोना” वर नियंत्रण मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. 22 मार्च) सर्व नागरिकांनी ‘जनता कर्फ्यु’ मध्ये सहभाग घ्यावा. तसेच सायंकाळी पाच वाजता सर्व नागरिकांनी टाळ्या वाजवाव्यात किंवा थाळीनाद करावा. असे आवाहन नगरसेवक केशव हनुमंत घोळवे यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून सॅनिटायझर बाजारातून गायब झाले आहे. तर अनेक ठिकाणी सॅनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे नगरसेवक केशव घोळवे आणि शिवशंभो फाऊंडेशनच्या वतीने शाहुनगर व संभाजीनगर परिसरातील नागरिकांना मोफत सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप शनिवारी केले. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू संसर्ग होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी, याची माहिती देणारे पत्रक नागरिकांना वाटण्यात आले. सर्दी, ताप, खोकला तसेच श्वसनाचा त्रास होत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा. असेही आवाहन नगरसेवक घोळवे यांनी केले.
यावेळी ऋतूराज, साई गणेश, ओम साई, शूभम, अभिषेक, अयोध्या, मंगलमूर्ती, अथर्व, शिवसुंदर सोसायटीचे आणि शिवशंभो महिला मंडळ, आधार महिला मंडळ, धनश्री महिला बचत गट, संचयनी महिला बचत गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनात भाजपा महिला शहर उपाध्यक्षा सुप्रिया चांदगुडे, शिवशंभो फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय तोरखडे, सचिव राजेश हजारे, उद्योजक किरण उढाणे, भाजप मंडलाध्यक्षा अश्विनी तोरखडे, दिपाली कारंजकर, स्वाती गायकवाड, मिनल दिक्षित, सविता बारवकर, सिमा साकोरे, रुपाली रांजणे, अरुणा घोळवे, जयश्री रोकडे, एन. क्यू. शेख, संजय नाईक, एन. बी. देशमुख, पी. एस. राणे, जालिंदर दिवेकर, एस. एस. हिरेमठ, दिलीप शेंडकर, हेमंत विभांडिक, यू. डी. गांगूर्डे आदी उपस्थित होते.
——–